मेडलाईफ फाऊंडेशन, बहाळ व आमचे सर्व सहकारी आयोजित

परमशांतीधाम वृद्धाश्रम ट्रस्ट, (एम.आय.डी.सी., टेकनोवा कंपनी समोर, पो. कोयनावेळे, ता. पनवेल) हे सन १९८७ साली निराधार व आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल असलेल्या वयोवृद्धांकरिता आधार म्हणून या वृद्धाश्रमाची स्थापना खोपोलीच्या श्री गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या आबानंदगिरी महाराजांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सदर वृद्धाश्रमाची पायाभरणी केली या ठिकाणी मेडलाईफ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकार्यांनी दिनांक : 8 जानेवारी २०१७ ,वार : रविवारी या दिवशी भेट दिली.
सर्व प्रथम वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अभय वाघ व विक्रम मोहिते यांनी आम्हाला पूर्ण वृद्धाश्रम दाखवून व तिकडे होणाऱ्या दैनंदिन दिनचर्ये बद्दल माहिती देऊन, वृद्धाश्रमात भविष्यकाळात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमा बद्दल थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात गौरव जैन यांनी करून सर्वाचे स्वागत केले. व उपस्थित असलेले मेडलाईफ फाउंडेशन संस्थेचे संस्थापक भुषण शिरुडे यांनी संस्थेबद्दल माहिती दिली त्यानंतर आभानंदगिरी महाराज व अर्पिता घोष यांचा सत्कार करण्यात आला. आभानंदगिरी महाराजांनी वृद्धाश्रमाबद्दल सर्वाना माहिती दिली त्यांनतर महेश सर यांनी आयुष्य कसे जगावे या विषयवार मार्गदर्शन केले.
अभय वाघ यांच्या बोलण्या वरून व वृद्धाश्रमातील एकंदरीत वातावरणा पाहता आम्हाला अंदाज आला की या वृद्धांना तिकडे सर्व काही मिळते पण त्यांना आपुलकीचा हात मिळत नाही व त्यांचे मनोरंजन होत नसल्याचे समजले. त्या वर आमच्या मेडलाईफच्या टीम ने ठरवले की आज यांचे मनोरंजन करायचे आणि त्यांच्या चेहऱ्या वर हसू फुलवायचे आणि त्यांना बोलतं करायचे.
मग सगळ्यांच्या विचारातरंगत असे ठरले की चित्र काढायला सांगुया काहींनी ड्रॉईंग पेपर्स आणि रंग पेटी आणल्या व त्यांना चित्र रेखटायला सांगितले … वृद्धांनी त्यांना जमेल तसे चित्र काढायला सुरवात केली. काहींनी घरं काढली… काहींनी निसर्ग चित्र काढलं… एका आजोबांनी संगीताची वाद्य काढली त्यांना संगीताची खूप आवड…..तर अजून एका आजोबांनी ते नदीकाठी बसून रीेलॅक्स करतानाचे चित्र रेखाटले….तर एका आजीने गणपतीचे चित्र काढले…सगळे आजी आजोबा चित्र काढताना जणू त्याचे बालपण आठवत असल्याची जाणीव आम्हां सर्वाना करन देत होते… आणि का नाही वाटणार म्हातारपण हे दुसरा बालपण असतं….!!!
आमचे परममित्र युवा सेनेचे उपशाखा अधिकारी, नेरुळ येथील मयुर दिपक डोंगरेकर यांनी वृद्धांसाठी जेवणाची सोय केली होती. वृद्धांना आम्ही सर्वानी जेवण वाढले. व त्यांच्या सोबत आम्ही हि जेवण ग्रहण केले.
त्या नंतर आम्ही पासिंग पास हा खेळ खेळलो त्याना गोल करून बसवलं आणि गाणी लावून खेळ चालू केला..त्या खेळा मद्ये एक आजोबा पहिल्यांदा आऊट झाले त्यांनी त्याची गाणे गायची इच्छा व्यक्त केली….व गाणं गायला सुरवात केली…. (मे शायर तो नही….) असा बोलून त्यांनी जी सुरवात केली आणि पूर्ण गाणं म्हंटलं…ते आजोबा एका अपघाता मद्ये आंधळे झाले होते…त्याच्या कडून असा गाणं कोणी अपेक्षित हि नव्हता केला….त्याच्या साठी सगळ्या आजी आजोबानी व आमच्या टीम ने जोरदार टाळ्या वाजवून त्याचा उस्ताह वाढवला… तर एका आजीने नाच केला…एका आजोबांनी ढोलकी वाजवून दाखवली…तर एका आजोबांनी शेर बोलून दाखवला.
मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ या सेवाभावी संस्थेच्या सर्व तरुण युवकांना सेवा करण्याचा योग परमशांतीधाम या वृद्धाश्रमात आला हे आम्ही आमचे भाग्य समाजतो तसेच आजी आजोबा सोबत आम्ही मनोरंजन केले. त्याच्या सोबत भरपूर खेळलोे व् हा दिवस सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवाप्रती संवेदना जाग्या असल्याची कबुली देत सत्कारणी लागला याच खूप समाधान वाटतय.
यापुढे अशीच सामाजिक बंधीलकी जपून अखंड आयुष्यात जितके जास्तीत जास्त चांगले कार्य आमच्या हातून करता येईल तितके करायचा मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ व् आमचे सर्व पदाधिकारी अहोरात्र प्रयत्न करत राहतील.