Kapsewadi Aashram Visit

अनाथ आश्रमला कापसेवाड़ी येथे भेट

Date 20 Dec 2016
Day :- रविवार

सामाजिक बांधिलकी……..

मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ
या सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत महंत आबानंदगिरी चैरिटेबल ट्रस्ट मौजे.कापसेवाडी पो.सरताले ता.जावळी जि.सातारा येथील अनाथ आश्रमातील गरिब व होतकरु मुलांना लागणाऱ्या दैनंदिन गरजू साहित्य मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ यांच्या तर्फे वाटप करण्यात आले.

महायोगी गगनगिरी विद्यार्थी आश्रमातील वस्तिगृहात एकुण ८५ विद्यार्थी आहेत व एकुण ०५ शिक्षक आहेत.

यावेळी उपस्थित मेडलाईफ फाऊंडेशनचे संस्थापक भुषण शिरुडे व मुंबई येथील सर्व सहकारी मित्र डाॅ.श्री. व सौ. महेंद्र मांढरे, मयुर डोंगरेकर ,महेश पाटील, चेतन पाटील, स्वप्निल राजपूत,रमाकांत नर्के, निशांत भारती, ओंकार माने, अक्षय यादव, शुभम जाधव, विवेक पवार, वसंत तारी, प्रसाद ठाकुर, वृषाली आणि प्रियंका यांची उपस्थिति….

सर्वप्रथम डाॅ.महेंद्र मांढरे सर यांनी आश्रमातील सर्व मुलांची आरोग्य तपासणी करुन औषधांचे वाटप केले व सर्वांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.

मेडलाईफ फाऊंडेशन चे संस्थापक भुषण शिरुडे यांनी त्यांच्या फाउंडेशन विषयी सर्व मुलांना महिती दिली व त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले तसेच सर्वांचे आभार मानले.

आश्रमातील विद्यार्थ्यांनी भविष्यात उद्योजक व्हावे म्हणून उद्योजकता या विषयवार मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच आमचे परम मित्र मयूर डोंगरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमतील सर्व मुलांना वही,पेन,
पेन्सिल,पुस्तक इ.स्टेशनरी देण्यात
आली व सर्व क्रीड़ा साहित्य वाटप करुण आम्ही सर्वांनी त्या गोंडस मुलांसोबत खेळून त्यांचा आनंद द्विगुणीत केला.