बहाळ येथे मेडलाईफ फाऊंडेशन तर्फे  25 गरोदर मातांची आरोग्य तपासणी………….

वार : ०९ जानेवारी २०१७ 
ठिकाण : सोमवार 

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत बहाळ येथिल जि.प.आयुर्वेदीक दवाखाना व मेडलाईफ फाऊंडेशन-बहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी गरोदर मातांचे वजन,रक्तदाब,हिमोग्लोबीन, अल्बुमिन शुगर व मधुमेह इ.तपासणी करण्यात आली.
नुकतेच भारताचे पंतप्रधान यांनी गरोदर मातांसाठी *6000* रु. मदत देण्याचे जाहीर केले , ह्या योजनेचा लाभ आपल्या गावातील प्रत्येक गरोदर मातांना मिळावा या योजनेपासुन कोणीही वंचित राहू नये म्हणून प्रत्येक गरोदर मातांचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे त्याविषयी जनजागृती म्हणुन बचत खाते उघडण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी एम.टी.जाधव, आ.पर्यवेक्षक शेळके नाना, आरोग्य सेवक वाय.आर. पाटील, सारीका हारदे, व सर्व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वितेसाठी मेडलाईफ फाऊंडेशन चे संदीप शिरुडे,संतोष भोई, शाम पाटील, कृष्णा चौधरी, सतिश चौधरी, पंकज चौधरी, सचिन चौधरी व मयुर चौधरी हे उपस्थित होते