मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ व रोटरी मिलेनियम तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर ………..

दिनाक : १५ डिसेंबर २०१६ 

वार :गुरुवार 

ठिकाण :मराठी मुलांची शाळा बहाळ 

मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ व रोटरी मिलेनियम आयोजित शिबीरा मध्ये बहाळ येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ व रोटरी मिलेनियम तर्फे करण्यात आले होते .शिबिराचे अध्यक्ष स्थानी बहाळ येथील उपसरपंच राजेंद्र महाजन यांनी भूषविले.
शिबिराचे उद्घाटन बहाळ येथील माजी मुख्याध्यापक आबासो. बी.जी.पगारे हे होते. शिबिरामध्ये १०१ रुग्णाची मशिनद्वारे मोतिबिंदू तपासणी करण्यात आली .
तपासणी दरम्यान ३३ रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉ.प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.

या ३३ रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल असे रोटरी मिल्लेनिम चे अध्यक्ष प्रितेश कटारिया यांनी सांगितले

शिबिरा दरम्यान नेत्रदान विषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी गावातील माजी सैनिक श्री.धर्मराज दगा महाजन व सौ.सुरेखा ध.महाजन यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

बहाळ गावातील 15 तरुणांनी नेत्रदान करण्याची आगळी वेगळी किमया करुन दाखवली व नेत्र दानाचा संकल्प केला .

मेडलाईफ फाउंडेशन’ चे अध्यक्ष संदीप शिरुडे यांनी सर्व गावातील नागरिकांचे व आलेल्या सर्व डॉ. यांचे आभार व्यक्त केले.