मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ आयोजित मधुमेह (डायबिटिस) तपासणी शिबीर

दिनाक; ०६ जानेवारी २०१७
वार:शुक्रवार
ठिकाण :सरकारी दवाखाना बहाळ

मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ व् जि.प.आरोग्य आयुर्वेदिक दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह (डायबिटीस) तपासणी व् निदान शिबीरा आयोजित करण्यात आले होते.
या शिबीरा दरम्यान *297 रुग्णाची तपासणी* करण्यात आली.तपासणी दरम्यान रुग्णाचे वजन,रक्तदाब,व् रक्तातिल साखरेचे प्रमाण तपासण्यात आले.
तपासणी दरम्यान ज्या रुग्णामधे साखरेचे प्रमाण अधिक आहे अश्या रुग्णाना मोफत औषधे देण्यात आली.

विशेष म्हणजे या शिबिराचे उदघाटन *23 राष्ट्रीय राइफल बटालियन जम्मू काश्मीर* येथे कार्यरत असलेले नर्सिंग सहाय्यक नायक संदीप बाबूलाल बागुल यांच्या तर्फे करण्यात आले व् त्यांनी सर्व रुग्णांना मार्गदर्शन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम. टी.जाधव यांनी मधुमेह या आजराची काळजी कशी घ्यावी या विषयावर सर्व ग्रामस्थाना मार्गदर्शन केले तसेच शिबिराला आरोग्यसेवक वाय. आर.पाटील,आरोग्य सेविका सारिका हारडे,मेडलाईफ फाउंडेशन चे संदीप शिरुडे,डॉ.अशोक लढ़े, डॉ.अश्विनकुमार ठाकरे,संतोष भोई,पंकज चौधरी,हरीष पाटील, मयूर चौधरी,सतीष चौधरी,कृष्णा चौधरी,गणेश हाडपे,सचिन चौधरी हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ,ड्रीम फाउंडेशन व् बहाळ विकास फाउंडेशन चे सर्व पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले