मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ ने आदिवासी पाड्यावर जाऊन साजरी केली मकरसंक्रांत

मकरसंक्रांतिचे औचित्य साधुन बहाळ येथील मेडलाईफ फाऊंडेशन व सर्व सहकारी मित्र यांनी दि.14 जाने. 2017 रोजी पनवेल तालुक्यातील आदिवासी भागातील चाफेवाडी व फणसवाडी येथे जाऊन तेथील गरिब व आदिवासी पाड्यांवर राहणार्यांना तिळगुळ,फराळ व कपडे देऊन त्यांच्यासोबत मकरसंक्रांत साजरी केली.

यावेळी मेडलाईफ फाऊंडेशन चे भुषण शिरुडे, मंत्रालयातील सहा.माहिती तंत्रज्ञान अधिकारी विनीत मालपुरे, सोऽहंम मेडिकल चे संचालक श्याम बहाळकर , मयूर डोंगरेकर,चेतन पाटिल, स्वप्निल राजपुत, अनिरुद्ध आस्तिकर, रोहित गट्टानी, गौरव जैन,प्रकाश जैन, उपस्थित होते.